नवीन निष्कर्ष : कोरोनामुळे नागरिकांचे आयुष्यमान होणार कमीवेब टीम : दिल्ली

कोरोनाची साथ गेली पाच ते सहा महिने झाले रोखता आली नाही. 


ही परिस्थिती आणखी काही महिने कायम राहिल्यास अल्प काळासाठी माणसाचे आयुर्मान (आयुमर्यादा) कमी होऊ शकते, असा धोक्याचा इशारा एका अभ्यासात व्यक्त केला आहे.


‘प्लॉस वन’ या नियतकालिकात या संदर्भातील संशोधन प्रकाशीत झाले असून 


त्यात ‘कोविड १९ संबंधित आरोग्य परिणामांमुळे आयुर्मानावर होणारे परिणाम’ या विषयावर जगाच्या चार प्रमुख भागातील विविध वयोगटाच्या लोकांमधील संसर्गाचा विचार करण्यात आला आहे.


शांघाय विद्यापीठातील प्राध्यापक गलिमी मॅरॉइस यांनी सांगितले, की काही देशांच्या पातळीवर कोरोनाचा परिणाम आयुर्मानावर दिसू लागला आहे. 


ज्या देशात कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला तेथे तो जास्त दिसून येत आहे. 


न्यूयॉर्क, माद्रिद, बेरगामो तसेच ब्राझीलचा काही भाग येथे आयुर्मान कमी झाले आहे. 


आयुर्मान सारणीची कोरोनाच्या संदर्भात फेरमांडणी करून सदृश्यीकरण व तुलनात्मक पद्धतीने त्याचा अभ्यास करण्यात आला.


त्यात कोरोनामुळे आयुर्मानावर फार थोड्या प्रमाणात परिणाम होईल हे खरे असले तरी हा परिणाम दोन टक्के असेल तर जिथे लोकांचे आताचे आयुर्मान ८० वर्षे आहे त्यांच्यासाठी हा फरक मोठा असेल. 


जिथे दहा टक्के परिणाम दर असेल तिथे आयुर्मान एक वर्ष किंवा त्याहून अधिक प्रमाणात घटू शकते.


 उत्तर अमेरिका व युरोपात ही शक्यता अधिक आहे. पन्नास टक्के दराच्या हिशेबाने जास्त आयुर्मान असलेल्या देशातील लोकांचे आयुष्य ३ ते ९ वर्षांनी कमी होऊ शकते. 


कोरोनाची साथ संपल्यानंतर मात्र आयुर्मान पुन्हा वाढू शकते. 


सहलेखक व ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड अ‍ॅनॅलिसिस’ या संस्थेचे राया यांनी म्हटले आहे,


 जेथे टाळेबंदी व सामाजिक अंतराचे नियम पाळले गेले नाहीत तेथे आयुर्मान कमी होऊ शकते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post