मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात अत्याचार झाल्यावर सगळे शांत बसतात...

 


वेब टीम : मुंबई

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. 


दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. 


आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला, यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत हाथरसच्या बलात्काऱ्यांना फासावर लटकवा असे ते म्हणाले आहेत .


तसेच केंद्रात मंत्री असणारे दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर न्यायाची मागणी करत रस्त्यावर उतरले होते अशी आठवण संजय राऊत यांनी यावेळी करुन दिली.


निर्भया प्रकरणानंतर नवीन कायदा करावा लागला होता. आज जे केंद्रात मंत्री आहेत ते आमचे साथीदार होते. 


आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते. 


पण आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा सगळे शांत बसतात. अशा घटनांशी सरकारचा कोणताही संबंध नसतो. 


पण जी पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्था असते त्यांनी तपास करुन गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचं काम करायचं असते ,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


अशा घटना का घडतात यासंबधी वारंवार चर्चा झाली आहे. सध्या देशात अशा घटना वाढत आहेत. 


कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं आहे. निर्भयावेळी जी भूमिका घेतली आज तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post