ड्रग्स तस्करी रोखणंही केंद्राचीही जबाबदारी आहे... संजय राऊतवेब टीम : मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत यांनी जया बच्चन यांचे समर्थन केले आहे. 


संसदेत जया बच्चन चुकीचे काय बोलल्या? 


ड्रग्स कनेक्शनमध्ये केवळ महाराष्ट्राचेच नाव का घेतले जात आहे? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.


ड्रग्स तस्करी रोखणंही केंद्राचीही जबाबदारी आहे. ड्रग्सचे काळे धंदे रोखण्यासाठी राष्ट्रीय एजन्सी निर्माण करण्यात आलेली आहे. 


प्रत्येक वेळी केवळ महाराष्ट्राचे नाव घेतले जात आहे. यूपी, बिहार आणि नेपाळहून ड्रग्स येतं, असे सांगतानाच ड्रग्सबाबत जे लोक बोलत आहेत, 


स्पोर्ट्समध्ये होते त्याप्रमाणे त्यांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले . 


“ही इंडस्ट्री पाच लाख लोकांना नोकरी पुरवते. जर कोणी हे संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तिथेच रोखलं पाहिजे. 


काही ठरावीक लोक इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलत आहेत.


फक्त इंडस्ट्रीच नाही तर आपली संस्कृती-परंपरा यांचीही बदनामी होत आहे. 


ते म्हणतात इथे ड्रग्स रॅकेट चालतं. हा फक्त राजकीय किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा भाग नाही? 


हे थांबवण्याची जबाबदारी सरकार आणि लोकांची आहे. ” असेही संजय राऊत म्हणाले .


दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचे जया बच्चन यांनी राज्यसभेत  सांगितले. 


“मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोलले जाते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post