आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता... शिवसेनेकडून बाबरी निकालाचे स्वागत..वेब टीम : मुंबई

बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. 


या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाचे शिवसेना स्वागत करते.


कोर्टाने सर्वांना निर्दोष सोडले आहे. कोर्टाने कट नसल्याचे सांगितले आहे. 


आता ‘त्या’ (बाबरी मशीद विध्वंस) घटनेला विसरायला हवे . 


लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे संजय राऊत यांनी सगळ्यांचं अभिनंदनही केलं आहे. 


आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होता, असेही संजय राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post