माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी अनंतात विलीन... शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...वेब टीम : दिल्ली

देशाचे माजी राष्ट्रपती, मुरब्बी राजकारणी, काँग्रेसचे संकटमोचक नेते, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात निधन झाले. 


ते ८४ वर्षांचे होते. आज दुपारी लोधी रोड स्थित स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात तसेच सैन्याच्या मानवंदनेसहीत अंत्यसंस्कार पार पडले. 


यावेळी मुलगा अभिजित मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पाडले. 


मुखर्जी यांचे पार्थिव ‘गन कॅरिज’ ऐवजी एका गाडीतून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत उपस्थित असणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान केले होते. 


तसेच प्रणव मुखर्जी यांच्या मृतदेहाला खांदा देणाऱ्यांनीही पीपीई कीट परिधान केले होते.


आज सकाळी दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील घरी प्रणव मुखर्जींचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 


तसेच उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post