उदयनराजे कडाडले... म्हणाले, सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेतले नाहीवेब टीम : मुंबई

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. 


सरकारने समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर 


मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, असे वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे .


शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. 


मात्र, या आरक्षणाचा आधीच मिळालेला लाभ अबाधित राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 


हे प्रकरण अधिक न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. 


सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post