बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का?वेब टीम : मुंबई

अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाच्या समर्थनार्थ भाजप  नेत्यांनी आवाज उठवला. 


त्यासोबतच राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनीही कंगनाचे समर्थन करत मुंबई महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. 


त्यावर शिवसेनेचे नेते परिवहनमंत्री अनिल परब यांनीदेखील राज्यपालांना प्रश्न केला आहे. 


अवैध बांधकामांवर प्रश्न उपस्थित करू नये का, असा प्रश्न अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केला आहे.


तसेच, कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई झाली असेल तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे समर्थन आहे का? 


असाही प्रश्न अनिल परब यांनी विचारला. 


“मुंबई महापालिकेचा कायदा काय आहे, ते बीएमसी कोर्टात सांगेल. 


जे  कोणी नियम फॉलो करणार नाहीत त्यांच्यावर  नियमाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. 


ज्यांचे बांधकाम अनधिकृत असेल, त्यांच्यावर कारवाई होईल.” असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post