हाथरस अत्याचार : मोदींचा योगी आदित्यनाथांना फोन... म्हणाले...वेब टीम : दिल्ली

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवरुन संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे . 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेची दखल घेतली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. 


योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. 


नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.


योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटले की , पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधवा. 


आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितले. 


योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली.दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. 


दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. 


या घटनेचा देशभरातून निषेध होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post