आतापासून मी भाजपा-आरएसएससोबत... शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्याची घोषणा...वेब टीम : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरून शिवसैनिकांच्या मारहाणीला बळी पडलेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

आतापासून मी भाजपा-आरएसएससोबत आहे. 


जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांनी, मी भाजपा-आरएसएससोबत असल्याचे माझ्यावर आरोप केले होते. 


आता मीच हे जाहीर करतो की, आतापासून मी भाजपा-आरएसएससोबत आहे.


शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांनी मारहाण केली. 


या प्रकरणी त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 


राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 


भाजपा नेते अतुल भातखळकरदेखील यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. 


महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे, असे भातखळकर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post