राज साहेबांचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशेब चुकता केला जाईल...वेब टीम : ठाणे

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे . 


सर्व व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले. 


यावरून आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केलं. कायद्याची प्रोसिजर ते आता पार पाडत आहेत. 


मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावं, ज्या वेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सरकार येईल तेव्हा हा सर्व हिशेब व्याजासकट चुकता होईल. 


आता जो त्रास देताय ते लक्षात ठेवतोय. त्याची नोंद करून ठेवतोय- असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी दिला.


सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत का माहिती नाही. पण हाय कोर्टाने कान टोचचे आहेत. 


त्यामुळे सरकारने आता तरी सुधारलं पाहिजे. लोकांची उपासमारी होत आहे. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. 


आज तीच गोष्ट हाय कोर्टाने म्हटली आहे. सरकार घरी बसून जबाबदारी सांभाळत आहे. 


सरकारने सर्वसामान्यांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.


दरम्यान सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी कर्जत पोलिसांनी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कलम १०७ अंतर्गत कारवाई केली आहे. 


या प्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज सुनावणी झाली. 


या सुनावणीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी हजर झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post