देवेंद्र फडणवीसांनी घेतली कंगनाची बाजू... ठाकरे सरकारवर टीका करत म्हणाले...वेब टीम : मुंबई

अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. 


कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. 


यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.


आज कंगना रणौत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. 


याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाचे कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे. 


तर, खुद्द उच्च न्यायालयाने देखील या कारवाईला स्थगिती दिली आहे.


राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगरललिकेच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. 


” छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार असून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे” असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post