मॉन्सून सक्रिय... पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार बरसणार...वेब टीम : मुंबई

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून पुन्हा मान्सून सक्रीय होत असून, 


१२ सप्टेंबरपासून पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 


शनिवारसाठी संपूर्ण कोकणला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून बरसत असलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे.


बंगालचा उपसागर, आंध्रप्रदेश, ओरिसाजवळ निर्माण होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १३ सप्टेंबरच्या आसपास विदर्भासह शेजारील भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या काळात मान्सून सक्रीय राहील. 


१४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोराचा पाऊस होईल. 


कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणाऱ्या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास उशिरा सुरू होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post