अबब... पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर झाला 'इतका' खर्च...वेब टीम : दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2015 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत 58 देशांचा दौरा केला. 


त्यावर 517 कोटी 82 लाखांचा खर्च झाला, अशी माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली. 


यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी प्रश्न विचारला होता. 


त्याला परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लिखित उत्तर दिले. 


पंतप्रधानांच्या या भेटींमुळे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांबाबतच्या भारताच्या दृष्टिकोनाबद्दल 


इतर देशांची समज वाढली आणि संबंध दृढ झाले, असे मुरलीधरन यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post