अफवा होती म्हणून केंद्रीय मंत्र्याने राजीनामा दिला का ? : संजय राऊत आक्रमकवेब टीम : दिल्ली

मोदी सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित असलेली दोन विधेयकं लोकसभेतील मंजुरीनंतर आज राज्यसभेत मांडली. 


केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयक मांडल्यानंतर विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्षांनी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून आले. 


शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारवर हल्लाबोल करत काही प्रश्न उपस्थित केले. 


यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.


यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, देशातील ७० टक्के लोक शेतीशी निगडित गेलेले आहेत. 


संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी शेतात राबत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?, 


त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची ग्वाही सरकार देणार का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.


पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, या विधेयकांना शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. 


तर पूर्ण देशात याला विरोध का होत नाहीये?


 जर देशभरात विरोध होत नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो की, विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. 


सरकारनं हे गैरसमज दूर करायला हवेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. 


त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का?, असा खोचक प्रश्न राऊत यांनी मोदी सरकारला केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post