मराठा आरक्षण : तामिळनाडूसाठी वेगळा आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय होऊ शकत नाही...वेब टीम : मुंबई

आमच्या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण आघाडी सरकारला टिकवता आले नाही, असा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


सध्या मराठा आरक्षणावरून केंद्र-राज्य असा वाद व्हायला नको. 


मराठा आरक्षणप्रकरणी राजकारण होऊ नये असे माझे मत आहे. 


राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात जे वकील दिले ते लहान नव्हते. 


कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


भाजप सरकारनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं.


तामिळनाडूसाठी वेगळा आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय होऊ शकत नाही. 


मात्र न्यायालयाचा निर्णय असल्याने मी त्याबाबत जास्त बोलणार नाही, असेही ते म्हणाले. 


आता मराठा आरक्षण स्थगितीवर अध्यादेश काढण्याचा पर्याय आमच्यासमोर खुला आहे. अध्यादेश काढल्यास आंदोलन होणार नाही.


कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, 


मला न्यायालयाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण निर्माण करायचं आहे, अशी ग्वाही पवारांनी यावेळी दिली. 


विरोधकांना राजकारण करायचे आहे. मात्र आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. 


न्याय मिळवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, असेही शरद पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post