मोदीजी, मराठा आरक्षणासाठी न्यायालयाला विनंती करा...वेब टीम : मुंबई

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे . 


यापार्श्वभूमीवर अन्य कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. 


मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हीच परिस्थिती तामिळनाडूतही होती मात्र, तेथील आरक्षण वैध ठरले. 


त्यामुळे महाराष्ट्रावर अन्याय करू नये, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.


बारामती मतदारसंघातील विकासकामांसदर्भात जिल्हा परिषदेतील बैठकीनंतर सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. 


राज्यासह देशात करोना, बेरोजगारी, अर्थव्यवस्था याच मोठ्या समस्या आहेत. त्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे, असेही सुळे म्हणाल्या.


दरम्यान मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. 


मात्र मराठा समाजाच्या बांधवांनी घाबरुन जाऊ नये त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. 


इतकंच नाही तर मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली गेली ती मागे घेण्यात यावी यासाठी फेरविचार याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post