संजय राऊत म्हणाले... अमित शाह खोटं बोलत नाहीत...वेब टीम : मुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेले आहेत. 


या संबंधांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केले . 


यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली .


अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. 


मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात, असे राऊत म्हणाले आहेत .


दरम्यान शहांनी राज्यपालांच्या पत्रातील मजकुराबद्दल नाराजी व्यक्त केली. 


‘राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. 


पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं. 


राज्यपालांनी ते विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड टाळायला हवी होती, असे शहा म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post