पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागणवेब टीम : दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. याची घोषणा करताना मला शब्द सापडत नाहीत.

परंतु मी सोप्या शब्दांत सांगते – मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. 

माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली कोरोना चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी, ही हात जोडून विनंती करते, असे ट्विट इराणी यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळालाही बसला आहे. 

गेल्या महिन्यात गृहमंत्री अमित शहा यांनादेखील कोरोना झाला होता. तसेच अन्य मंत्र्यांनादेखील कोरोना झाला होता. 

गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे दिल्लीत निधन झाले. 

त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याशिवाय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाली आहे. 

तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनाही कोरोनाची लागण झाली. ते सध्या मुंबईत उपचार घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post