सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न... ?वेब टीम : दिल्ली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर गंभीर आरोप केले आहे. 


याबाबत जगनमोहन रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे. 


थेट सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशावर अशाप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून केल्या जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर येत आहे. 


न्यायव्यवस्थेवर जगनमोहन सरकारने थेट हल्ला चढवला आहे.


सुप्रीम कोर्टातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश एन वी रमन्ना, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


याबाबत त्यांनी आठ पानांचे पक्ष बोबडे यांना लिहिले आहे.  


नायडू यांच्या सरकारच्या काळात विशिष्ट प्रकरणामधील उच्च न्यायालयाचे विशेष निर्णय आणि न्यायधीशांची नावं यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात देखील रेड्डी यांनी सांगितले आहे.


रमना टीडीपी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय आहेत.त्यांच्या इशाऱ्यावरून वायएसआर काँग्रेसचे सरकार पाडू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


यापूर्वी त्यांच्या पक्षाचे नेते व मंत्र्यांनी विविध मुद्यांवरून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधत वक्तव्यं केलेली आहेत. 


सहा अ्ॅाक्टोबर रोजी रेड्डी यांनी बोबडे यांना लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमांसमोर आले. 


न्यायाधीश रमन्ना व चंद्रबाबू नायडू यांच्यातील घनिष्ठ संबंधाबाबत विस्तृतपणे रेड्डी यांनी या पत्रात सांगितले आहे. 


सरन्यायाधीश बोबडे यांच्या नंतर एन वी रमन्ना हेच सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post