उत्तर प्रदेशात कायदा - सुव्यवस्था अपुरी.... अण्णांचं टीकास्र...वेब टीम : अहमदनगर

हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. 


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


त्यांनी कायदा, सुव्यवस्था अपुरी पडत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.


निष्क्रीय सरकार आणि व्यवस्थेचे कान टोचण्यासाठी देशातली यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असल्याचं ते म्हणाले. 


ते म्हणाले की, “हाथरसमधील घटना देशासाठी शरमेची बाब आहे. 


देशात सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ते अपुरे पडत आहेत.”


बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणारे नराधम मानवतेसाठी कलंक असल्याचे ते म्हणाले. 


देशाच्या भव्य सांस्कृतिक वारशाचे उदाहरण देत त्यांनी भारताच्या ऋषीमुनींपासूनच्या परंपरांचा दाखला दिला. 


ते म्हणाले, “भारताची संस्कृती विश्वातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. देशात अशा प्रकारचे गुन्हे घडणे ही खूप चिंताजनक बाब आहे.”


पुढे, उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी असल्याचं सांगत, 


ही फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या असल्याचेही ते म्हणाले. 


तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे भविष्यकाळात घडू नयेत म्हणून नराधमांना फासावर लटकावण्याची मागणीही त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post