पंकजा मुंडे म्हणाल्या... मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण...वेब टीम : मुंबई

राज्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने संवेदनशीलपणे निर्णय घेऊन मदत करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 


मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


ऊसतोड कामगारांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याही घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली आहे.


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .


या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली .


एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. 


खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post