केंद्र सरकारनंही शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करावा...

file photo


वेब टीम : मुंबई

परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्या दौऱ्यावर आहेत . 


यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शरद पवार थेट पंतप्रधानांची भेट घेणार असून, 


किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत. तेव्हा आता या संकटाने खचून जाऊ नका , मी तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले .


अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपूर आहे. त्यामुळं एकट्या राज्याला मदत देणं कठिण असल्यामुळं 


केंद्रानंही या बाबतीत मदतीचा हात पुढं करावा, असं पवार यावेळी म्हणाले.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस दौरा करत आहेत. 


राज्यात कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठा प्रमाणात परतीच्या पावसामुळे भातशेती आणि पिके तसेच बागायतदारांचे नुकसान झाले आहे. 


पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. 


त्यामुळे पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post