उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य...वेब टीम : सिंधुदुर्ग

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात जास्त निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत, 


अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे केली.


आज येथे पत्रकारांशी बोलताना, उद्धव ठाकरे यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे. 


ते अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून काय साधणार आहेत असा टोमणा त्यांनी मारला.


कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. 


आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे, असे राणे म्हणालेत.


अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरु केला आहे. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. 


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही कोकणातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post