एकनाथ खडसे भाजपला देणार जोरदार झटका... आमदारांसह राष्ट्रवादीप्रवेश...?वेब टीम : जळगाव

भाजपमध्ये नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षांतर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर आणि जवळपास १५ आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहितीही पुढे आली आहे. 


मात्र भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे कुठला निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. 


मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे पक्षांतर करत मोठा भाजपला धक्का देतील, असे आता सांगितले जाते आहे. 


तर दुसरीकडे खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. 


दुसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. 


दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्षे पूर्ण करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील १० ते १५ आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. 


विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं. 


मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. 


आता खडसे बापलेक राष्ट्रवादीत गेल्यास त्याचा भाजपला उत्तर महाराष्ट्रात जबर धक्का बसण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post