मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे...वेब टीम : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्र लिहून मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सुनावले आहे. 


यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. 


तुम्ही राज्यात सर्वकाही सुरू केलं. दारूची दुकानंही सुरू केलीत; पण मंदिरं सुरू केली नाहीत.


अशा वेळी तुम्हालाच हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही तर कुणाला आहे, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले .


मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा आहे. 


सर्वकाही सुरू करण्यात आले पण मंदिरं सुरू करण्यात आली नाहीत. 


माणसाला जशी भुकेची गरज असते तशीच मन:शांतीचीही गरज असते.


भारतातील लोक पूजा-अर्चा करतात म्हणून देशातील आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . 


तुम्हालाच हिंदुत्व शिकवावं लागेल. तुम्ही सत्तेच्या गादीवर बसला आहात. 


स्वातंत्र्यावीर सावरकरांवर काँग्रेसने टीका केली तेव्हा तुम्ही गप्प बसलात. 


त्यामुळे हिंदुत्व शिकवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post