धक्कादायक... उत्तर प्रदेशात पुजाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्नवेब टीम : लखनऊ

उत्तर प्रदेशात एका पुजाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


आज सकाळी घडलेल्या या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. 


अतुल बाबा उर्फ सम्राट दास असे गोळीबारात जखमी झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. तो राम जानकी मंदिराचा पुजारी आहे. 


त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागली आहे. दास यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. 


त्यानंतर त्यांना लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 


या विषयी पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे म्हणाले की, या प्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


यातील महंत सीताराम दास आणि इतर दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 


इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. 


भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


पुजारी दास यांच्यावर जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आला आहे. 


दास यांची तिरे मनोरमा गावात सुमारे 30 एकर जमीन आहे. काही गावकऱ्यांशी या जमिनीवरुन त्यांचा वाद आहे. 


यातूनच हा प्रकार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल पोलीस आणि प्रशासनाला जबाबदार धरले आहे. 


मंदिराच्या सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तरीही ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post