फडणवीस म्हणाले... उद्धव ठाकरेंचं 'ते' पत्र अत्यंत दुर्दैवीवेब टीम : मुंबई

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे, 


ते अतिशय दुर्दैवी असे उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहे. यावेळी ते बोलत होते .


राज्यपाल यांच्याकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. 


त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. 


पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे. 


तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना ही स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. 


छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई लढतो, असल्याचे सांगतो 


पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते , अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post