रात्रीतून अंत्यसंस्कार करणारे उत्तरप्रदेश पोलिस म्हणतात.. 'त्या' मुलीवर अत्याचार झालाच नाही...वेब टीम : हाथरस

अत्याचार झाल्यानंतर कुटुंबियांना न कळविता मुलीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांनी नवा दावा केला आहे.


हाथरसच्या 19 वर्षीय मुलीवर बलात्कार झालाच नाही, असा दावा यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी केला आहे. 


“फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नाही, असं स्पष्ट म्हटलंय.  


तिच्या गळ्याला लागलेला मार आणि धसक्याने तिचा मृत्यू झालाय”, असा दावा त्यांनी केलाय.


“फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातूनही स्पष्ट झाले आहे की तिच्यावर बलात्कार झाला नाही. 


घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातदेखील आपल्यावर बलात्कार झाल्याचे तरूणीने म्हटले नाही. 


फक्त मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता”, असं प्रशांत कुमार म्हणाले.


“काही लोक सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी आणि जातीय हिंसा भडकवण्यासाठी चुकीची माहिती पसरवत आहेत. 


पोलिसांनी हाथरस प्रकरणात त्वरित कार्यवाही केलीये. 


ज्या लोकांनी याप्रकरणात चुकीची माहिती पसरवली त्यांचा शोध घेण्याचं आमचं काम सुरु आहे. 


घडलेलं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणात जे कुणी गुन्हेगार असतील त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. 


त्यांना कठोरात कठोर शासन करु”, असं प्रशांत कुमार म्हणाले.


“हाथरसच्या मुलीचा मेडिकल रिपोर्ट येण्यापूर्वीच सरकारविरोधात वक्तव्य करण्यात आली तसंच पोलिसांची प्रतिमा मलीन केली गेली. 


आम्ही याचा शोध घेऊ की नेमकं हे कुणी केलंय. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. 


उत्तर प्रदेश सरकारने आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे”, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post