खडसेंची नाराजी पुन्हा उघड... फडणवीसांना भेटणे टाळले...वेब टीम : जळगाव

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. 


त्यामुळे एकनाथ खडसे यांची पुढची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागलेले आहे. 


त्यातच आज जामनेरमध्ये रुग्णालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खडसे – फडणवीस  महाजन एकाच मंचावर येणार होते. 


परंतु, आपण हजर राहणार नसल्याचे खडसे यांनी आधीच जाहीर केले आणि एकत्र येणे टाळले.


गेल्या काही वर्षांपासून आपल्यावर पक्षांतर्गत अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. 


तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. 


नेमके याच काळात जामनेर येथे गिरीश महाजनांच्या पुढाकाराने उभारलेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे लोकार्पण आज मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने गिरीश महाजनांनी त्यासाठी खडसेंनाही निमंत्रण दिले होते.  


त्यामुळे त्या ठिकाणी खडसे- फडणवीस भेटीबाबत उत्सुकता होती. मात्र, खडसे यांनी मंगळवारी दुपारीच जामनेरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post