आज देशात दोनच गोष्टी वाढतात एक मोदींची दाढी आणि दुसरी बेरोजगारी...वेब टीम : कोल्हापूर

आज काँग्रेसच्या माध्यमातून शेतकरी बचाव रॅली होत आहे. 


ही होत असताना कामगारांच्या विरोधात असणाऱ्या कामगार विरोधी कायद्या विरुध्द देखील आम्ही एल्गार पुकारत आहोत.


मोदी स्वत:ला विकास पुरुष म्हणवून घेतात. परंतू विकास मधला ‘स’ गायब झालाय आणि आता ते विका पुरुष आहेत. 


उदा. LIC असले, बँका असतील किंवा संस्था असतील.


देशात फक्त बेकारी आणि मोदी यांची दाडी या दोनच गोष्टी वाढत आहेत असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज काँग्रेसच्या कृषी विधेयक विरोधात सुरू असलेल्या रॅलीमध्ये लगावला.


ना. पाटील म्हणाले, देश IPL बघत असताना कामगारांच्या काळ्या कायद्याच्या माध्यमातून कामगारांची विकेट काढण्याच काम मोदी सरकारन केलं आहे. 


देशामध्ये 50 कोटी लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. या सगळ्यांचा संसार उद्धवस्त करण्याच काम मोदी सरकारने केले आहे. 


हा कायदा भल्यासाठी असेल तर यावर संसदेत चर्चा का झाली नाही, हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.


अनेक जटील अटी यामध्ये आहेत. कामगारांना मालका बरोबर करार करावा लागणार आहे. नोकरीची हमी निघून गेली आहे. 


100 कामगार असणारा कारखाना बंद करायचा असेल तर आज शासनाची परवानगी घ्यायला लागत असे. 


परंतू आता 300 पर्यंत कामगार संख्या असलेल्यांना ही परवानगी घ्यावी लागणार, याचा अर्थ कधीही कुणालाही काढण्याची मुभा या मध्ये देणेत आली आहे. 


संप करायचा असेल तर 60 दिवसांची Notice द्यावी लागणार आहे. कामांचे तास निश्चित नाहीत. अशा अनेक कामगार विरोधी अटी यामध्ये आहेत. 


कामगार चळवळीतून कामगार हिताचे अनेक कायदे या देशामध्ये आजपर्यंत (Congress) ने केले आहेत. 


परंतू या भाजपच्या कायद्यांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहे.


आज जो काय कामगार कायदा झाला आहे तो मोदींच्या मित्रांसाठी झालेला आहे. कामगारांच्या हितासाठी नाही. 


आज देशात दोनच गोष्टी वाढतात एक मोदींची दाढी आणि दुसरी बरोजगारी.


महाराष्ट्रामध्ये एस टी बसच्या माध्यमातून अल्पदरामध्ये 2.50 लाख मे. टन वाहतुक केली आणि त्यामध्ये तब्बल 1 लाख टन खते, बी-बियाणे, फळे, भाजीपाला यांची वाहतुक केली गेली आहे. 


भविष्यकाळात देखली एसटी च्या माध्यमातून अल्प दरामध्ये शेतक-यांच्या मालाची वाहतुक मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत. 


महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना व्यवस्थितपणे हाताळण्याचं काम केलं. 


आणि म्हणून आमच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये हे आंदोलन आम्ही करत आहोत. 


भाजपचा खरा चेहरा लोकांपुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ना. पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post