१५ वर्ष वाटाणे सोलत होतात का?वेब टीम : दिल्ली

बिहार विधानसभेचा निवडणूक प्रचार आता वेगात आला आहे. 


भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी त्यांच्या ‘संधी मिळाली तर’ या वाक्यप्रयोगाने फसले आहेत. 


कारकाट येथे प्रचार सभेत मोदी म्हणालेत, संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही. 


यावर राबडीदेवी यांनी त्यांना टोमणा मारला. 


१५ वर्ष वाटणे सोलत होतात का ? 


सुमारे १५ वर्षांपासून बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जदयू आणि भाजपाची सत्ता आहे, हे उल्लेखनीय.


सुशील मोदी यांच्या या वक्तव्याच्या बातम्या छापून आल्या. 


सुशील मोदी यांनी त्यापैंकी एक बातमी ट्विटरवर शेअर केली. 


इथे राबडी देवी यांनी मोदींना कोंडीत पकडले. 


राबडी देवी यांनी मोदी यांचे ट्विट रिट्विट करत टोमणा मारला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post