अनेक भारतीय लोक आजही दलित, मुस्लीम व आदिवासींना माणूस मानतच नाहीवेब टीम : दिल्ली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवर उत्तर प्रदेश सरकारवर रविवारी पुन्हा एकदा निशाणा साधला. 


’मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पोलिसांनी सांगितले की, हाथरसमधील दलित तरुणीवर बलात्कार झालेला नाही. 


कारण त्यांच्यासाठी आणि अन्य अनेक भारतीयांसाठी ती कोणीच नव्हती,’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी राग व्यक्त केला. 


हाथरस प्रकरणात एका दलित तरुणीचा कथित सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाला. 


राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, लज्जास्पद म्हणजे अनेक भारतीय लोक आजही दलित, मुस्लीम व आदिवासींना माणूस मानतच नाही.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करीत पुन्हा एकदा हाथरसमध्ये झालेल्या घटनेवर असंतोष व्यक्त केला आहे. 


हाथरस येथील एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती.


मात्र योगी सरकार आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे नाकारले. 


मात्र या प्रकरणात मुलीने स्वत: तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले होते, अशी माहिती आहे. 


उत्तर प्रदेशातील हाथरस कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय दलित मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post