उत्तरप्रदेशच्या योगी सरकारला नेमकी कशाची भीती वाटत आहे..? राज ठाकरेंचा सवाल...वेब टीम : मुंबई

संपूर्ण देशातून हाथरसप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. 


ज्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


हाथरस मथली ही घटना पाशवी आहे. 


पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, 


ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य बागणान्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे! 


अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.


उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे 


पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. 


उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?


बरं,समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? 


त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?


महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? 


सर्व माध्यमे उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाही? त्यांना का जाब विचारला जात नाहीये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post