मला तिकीट न मिळाल्याने राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवारांनी माझी विचारपूस केली होती...

 


वेब टीम : मुंबई

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मला तिकीट मिळाले नाही. 


मनसेप्रमुख राज ठाकरेंसह  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी फोन करून माझी विचारपूस केली होती. 


परंतु, तिकीट न मिळाल्यामुळे भाजपा (BJP) सोड आणि आमच्याकडे ये, असे म्हणायची हिंमत यापैकी कुणीही केली नाही. 


कारण, मी पक्का संघवाला आहे. विद्यार्थी परिषदेचा आहे, हे त्यांना माहीत आहे, 


असे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी सांगितले.


विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 


विनोद तावडे म्हणाले की, पक्षाने आपल्यासाठी चांगला निर्णय घेतला, तर आपल्याला बरे वाटते आणि काही वेगळा निर्णय घेतला तर मग वाईट वाटून घेऊ नये. 


कारण पक्षाने काही विचार केलेला असतो. जर आज तिकीट दिले नाही, तर वाईट का वाटावे ? 


परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तावडे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. 


ते म्हणाले की, राजकारणात चढउतार येतच असतात. कुणीही एकाच ठिकाणी राहात नाही.


हा साप-शिडीचा खेळ आहे. विनोद तावडे यांच्याकडून संयम ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post