सुपा शहरात मोटारसायकल चोरणारी टोळी सक्रीय दोन मोटारसायकल चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद पारनेर प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील सुपा शहरात ऐन स...
सुपा शहरात मोटारसायकल चोरणारी टोळी सक्रीय
दोन मोटारसायकल चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा शहरात ऐन सणासुदीच्या काळात मोटारसायकल चोरटे सक्रिय झाले असुन रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या दुकानासमोर मोटारसायकल लावायला मालक चालकांमध्ये आपली गाडी जाईल, की काय अशी भिती निर्माण झाली आहे. दोन दिवसापुर्वी शहाजापुर चौकात मळगंगा देवीच्या मंदीराजवळ संकेत पवार यांची मोटारसायकल चोरट्यांनी पळवळी.
चोरट्याच्या सर्व हालचाली व सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असुन सदर चोराने चोरी करताना तोंड बांधलेले दिसत आहे. सदर चोरीतील आरोपी २० ते ३० वयोगटातील दिसत आहे. तसेच एक दिवसांपूर्वी सुपा बाजारतळ येथुनही एक मोटारसायकल चोरी गेली आहे.
दिपावली सण तोंडावर आला आसताना रोज चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सुपा औद्योगिक वसातीमुळे सुपा शहराचा विस्तार वाढत आहे. नोकरदार, व्यावसायिक, कंपनी मॅनेजर यासह कामगार सुपा शहरात राहण्याला पसंती देतात.
विस्तारलेले नागरिकरण सुरक्षेच्या द्रुष्टीने थोडे गैर सोयीचे होत आहे. याचाच फायदा हे भुरटे चोर घेत आहेत. रोजच लहान मोठ्या चोन्या होत आहेत. दोन दिवसांपुर्वी शहाजापुर चौकातुन गाडी चोरताना चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला असुन तोंड बांधलेले आसल्यामुळे हा गाडी चोरा आद्याप पोलीसांना सापडू शकला नाही. दरम्यान यापूर्वी शहरात अनेक मोटारसायकलींची चोरी झाली आहे. सुपा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र पोलिसांकडून अद्याप एकाही मोटारसायकल चोराला अटक करण्यात आली नाही. याबद्दल परीसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दखल घ्यावी
सुप्यात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सुपा पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करावे. ऐन सणासुदीच्या काळात चोरटे सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.
- प्रताप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, सुपा.
COMMENTS