राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रीतम दाभाडेला " ब्राँझ पदक" ७२ किलो वजन गटात अतुलनीय कामगीरी ! पारनेर प्रतिनिधी : तालुक्य...
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रीतम दाभाडेला " ब्राँझ पदक"
७२ किलो वजन गटात अतुलनीय कामगीरी !
पारनेर प्रतिनिधी :
तालुक्यातील भाळवणी येथील सम्राट आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील महिला कुस्ती पटू प्रीतम दाभाडे हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात "ब्राँझ पदक" मिळविले आहे.२६ ऑक्टोबर रोजी सातारा येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महिला कुस्ती स्पर्धेत अतुलनीय कामगिरी केली असून या अगोदर पण अनेक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.
भाळवणी तील सम्राट आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे संस्थापक प्राध्यापक संतोष भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती प्रशिक्षक ( वस्ताद) पोलिस हेड कॉन्स्टेबल शैलेश रोहकले राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच मनोज शिंदे महिला कुस्तीपटू प्रीतम दाभाडेने यश मिळविले आहे. या महिला कुस्तीपटू दाभाडे हिने २०१९ साली राज्यस्तरीय स्पर्धेत सिल्व्हर पदक पटकावले असून खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.
तसेच प्रथम महिला शिरुड केसरी पुणे व महापौर चषक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल महिला कुस्तीपटू प्रीतम दाभाडी चे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह पारनेर पत्रकार संघाच्या वतीने व कुस्तीगीर संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. एक ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटू अतुलनीय कामगिरी केल्याने सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS