युवासेना उपतालुकप्रमुखपदी अमोल ठुबे यांची निवड डॉ श्रीकांत पठारे यांच्या सोबत अमोल ठुबे सामाजिक कामात अग्रेसर पारनेर/प्रतिनिधी : पारनेर ताल...
युवासेना उपतालुकप्रमुखपदी अमोल ठुबे यांची निवड
डॉ श्रीकांत पठारे यांच्या सोबत अमोल ठुबे सामाजिक कामात अग्रेसर
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातीक कान्हूर पठार येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल एकनाथ ठुबे यांची पारनेर तालुका युवासेना उपतालुकप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
अमोल ठुबे हे कान्हूर पठार गावचे असून तालुक्यातील सामाजिक,राजकीय कामात त्यांच्या मोठा सहभाग असतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पारनेर येथील पूर्णवाद भवन कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य शिवसेना नेते डॉ श्रीकांत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ठुबे यांनी कोव्हीड रुग्णांची सेवा केली. संजय गांधी, श्रावण बाळ योजना याखेरीज नागरिकांची वैयक्तिक लाभाची शासकीय कामे करून देण्यास अमोल ठुबे यांचा पुढाकार असतो.
त्यांच्या याच सामाजिक कामाची दखल घेत शिवसेनेच्या वतीने त्यांना पारनेर तालुका युवासेना उपतालुकप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियांका खिलारी आदी उपस्थित होते. अमोल ठुबे यांच्या निवडीनंतर तालुक्यातील शिवसैनिक तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
COMMENTS