धोत्रे खुर्द येथील सर्व विद्यार्थ्यांना देणार स्वखर्चातून मास्क शिक्षक सचिन ठाणगे यांचा मास्क बँक चा आदर्श उपक्रम पारनेर प्रतिनिधी : ...
धोत्रे खुर्द येथील सर्व विद्यार्थ्यांना देणार स्वखर्चातून मास्क
शिक्षक सचिन ठाणगे यांचा मास्क बँक चा आदर्श उपक्रम
पारनेर प्रतिनिधी :
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुर्गम भागातील जि.प.प्राथ शाळा धोत्रे खुर्द येथे दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर शाळेमधे मास्क बँक स्थापन करून प्रती विद्यार्थी 2 मास्क देणार आहेत. मास्क हे दोन रंगात असल्यामुळे विद्यार्थ्याना दिवसाआड वापरण्यास सोपे जाणार आहे . सदरील मास्कसाठी लागणारा सर्व खर्च धोत्रे खुर्द शाळेतील उपक्रमशील शिक्षक सचिन ठाणगे यांनी केला आहे .
त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कारण या आगोदर सुद्धा ठाणगे यांनी शाळेमधे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे म्हणून ' ज्ञानपेटी' ,
उन्हाळ्यामधे पक्षांसाठी 'धान्य व पाणी' शिवजयंती निमित्त वृक्षारोपन रंगभरण हस्ताक्षर व निबंध स्पर्धा' प्लास्टीक मुक्ती व्हावी म्हणून वर्तमान पत्रापासून 'कागदी पिशव्या' तयार करणे मतदान जागृतीसाठी ' मेंढपाळांची प्रत्यक्ष भेट' कोव्हीड १९ च्या काळामधे क्वारंटाईन कुटूंबाकडून ' शाळेची स्वच्छता' शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत ज्ञानदूतांमार्फत ' वस्ती तेथे शिक्षण',
इ.१ते ४थी च्या वर्गांसाठी ' स्वाध्यायपुस्तिका ' निर्मिती इ.उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक ज्ञानात भर घातली आहे. या नाविन्यपूर्ण मास्क बँक संकल्पनेचे केंद्रप्रमुख अविनाश गांगर्डे, विस्तार अधिकारी गेणूजी नरसाळे , गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे व शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी कौतूक केले आहे. गावचे सरपंच , मुख्याध्यापक , शिक्षक व ग्रामस्थ यांनी कौतूक करून ठाणगे सरांचा गावाला व शाळेला सार्थ अभिमान आहे अशी भावना व्यक्त केली.