अहमदनगर : राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच...
राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन देण्यात आले अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैयक्तीक कामं, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी स्वतःच्या PF खात्यातून पैसे मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत. मात्र राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. वेळेवर पैसे न मिळाल्याने शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांचे उपचार थकले आहेत. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांची फी थकली आहेत,
शिक्षक, कर्मचारी यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे न झाल्यास शासनाबद्दल एक अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे तात्काळ BDS प्रणाली सुरू करून PF धारकांना महिना अखेरपर्यंत त्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशाराही शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, मोहमंद समी शेख. जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर. योगेश हराळे.उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु ,जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे , कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उच्च माध्यमिक चे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत रायकर , नवनाथ घोरपडे .सुदाम दिघे, संतोष देशमुख . किसन सोनवणे.संजय तमनर . कैलास जाधव. संतोष शेंदुरकर, जिल्हा कार्यवाह संजय भूसारी. जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख.रेवन घंगाळे. जॉन सोनवणे. महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर सचिव विभावरी रोकडे कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. रूपाली बोरूडे, रूपाली कुरूमकर आदींनी दिली आहे .