अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तब्बल सहा वर्षानंतर अहमदनगर जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती ...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तब्बल सहा वर्षानंतर अहमदनगर जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021 रंगणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष कुस्तीच्या स्पर्धा झाल्यानसून या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज मल्लांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवयास मिळणार आहे. अहमदनगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पाथर्डी तालुक्यातील एस.एम. निर्हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या स्पर्धेत सर्व मल्लांनी सहभाग घेण्याचे आवाहन स्पर्धेचे आयोजक केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापकाका ढाकणे व जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी केले आहे.
ही स्पर्धा दि.20 व 21 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि.20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आमदार निलेश लंके व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रविवारी 21 नोव्हेंबर रोजी दिवसभर कुस्त्या रंगणार असून, संध्याकाळी उत्तर महाराष्ट्र केसरीसाठी निकाली कुस्ती होणार आहे. यावेळी विजेत्या मल्लांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र केसरीच्या विजयी मल्लास 51 हजार रुपये रोख व चांदीची गदा, उपविजयी मल्लास 31 हजार रुपये रोख व चषक तर तृतीय विजयी मल्लास 21 हजार रुपये रोख व चषक बक्षिस देण्यात येणार आहे. तर प्रत्येक गटातील विजयी मल्लास रोख बक्षिस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल एकूण अडीच लाख रुपयांचे बक्षिस, मेडल व प्रमाणपत्र मल्लांना देण्यात येणार आहेत.
मल्लांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्राचे अर्जुनवीर पुरस्कार पै. काकासाहेब पवार, पै. राहुल आवारे, पै. संभाजी लोंढे, महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस, महान भारत केसरी विजूभाऊ गावडे हजेरी लावणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. गोरख बलकवडे, नाशिक शहर तालिम संघाचे अध्यक्ष पै. संजय चव्हाण, जळगाव तालिम संघाचे अध्यक्ष पै.सुनिल देशमुख, धुळे जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. सुनिल चौधरी, पै. विलास काथुरे, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, अमरावती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. संजय तीर्थंकर उपस्थित राहणार आहेत.
या कुस्ती स्पर्धेत जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील सर्व मल्लांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मल्लांना वयाची अट नसून, ही स्पर्धा 48, 58, 65, 74, 84 व खुला उत्तर महाराष्ट्र केसरी गट (84 ते 120 किलो वजन) या सहा वजन गटात होणार आहे. एस.एम. निर्हाळी उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या भव्या प्रांगणात दोन मॅट व एक मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. सर्व कुस्त्या मॅटवर होणार असून, उत्तर महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या लाल मातीत गुण पध्दतीने राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे होणार आहे.
शेवटची उत्तर महाराष्ट्र केसरी मातीमध्ये बेमुदत निकाली रंगणार आहे. या स्पर्धेत तब्बल तीनशे पेक्षा जास्त मल्लांचा सहभाग राहणार असून, दिवस-रात्र कुस्त्या होणार आहेत. प्रेक्षकांना देखील बसण्याची सोय करण्यात आली आह् दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. स्पर्धेला येताना मल्लांना आधारकार्ड आणण्याचे सांगण्यात आले आहे. कुस्ती खेळाला चालना व मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक प्रतापकाका ढाकणे यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, अॅड. धनंजय जाधव, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै राजेंद्र शिरसाठ, पै. विलास चव्हाण, पै. मोहन हिरणवाले, पै. सुनिल भिंगारे, कुस्ती मल्लविद्येचे पै. गणेश मानगुडे, वरिष्ठ उपाध्यक्ष पै. दत्तात्रय आडसुरे, पै. युवराज पठारे, पै. विक्रम बारवकर, पै. संदीप बारगुजे, पै. प्रताप पाटील चिंधे, महादेव आव्हाड, कुस्ती मल्ल विद्येचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जपे, नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव बाळू भापकर, पंच गणेश जाधव, पै. बबलू धुमाल, पै. प्रवीण घुले, पै. अनिल गुंजाळ परिश्रम घेत आहे.
COMMENTS