नगर - नगर - पाथर्डी लगत असलेले मेहेकरी गांव येथे एका मंदिराजवळ इंडियन स्पेक्टिकल कोबरा (नाग) जातीचा साप निघाला. मेहेकरी गांवचे सामाजिक क...
नगर -
नगर - पाथर्डी लगत असलेले मेहेकरी गांव येथे एका मंदिराजवळ इंडियन स्पेक्टिकल कोबरा (नाग) जातीचा साप निघाला. मेहेकरी गांवचे सामाजिक कार्यकर्ते संतोष करपे यांनी त्वरित सर्पमित्र आकाश जाधव यांच्याशी संपर्क केला आणि साप पकडण्यासाठी बोलावून घेतले, काही वेळात सर्पमित्र आकाश जाधव त्या ठिकाणी पोहचून मोठ्या सीताफीने नागाला इजा न होता पकडले आणि त्या नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
या नागा विषयी माहिती देत असताना सर्पमित्र अकाश जाधव म्हणाले, नाग हा अत्यंत विषारी साप असतो, नाग भारतात सर्वत्र आढळतो, या सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, हिंदीमध्ये गेहुअन आणि नाग, मराठीमध्येे नाग, बंगालीमध्ये खरीस आणि गोखुरो, पंजाबीमध्ये पदम्, या नावाने ओळखले जाते याचे वैज्ञानिक नाव नाजा-नाजा असे आहे, रंग छटा काळपट, पिवळसर, तपकिरी, कधी कधी थोड़ासा सिलवर रंगा मधे आढळतो, याची लांबी अधिकतम 6 फुट 7 इंच होते, नाग हा फणाधारी साप असतो पण हा नेहमी आपले फणा काढत नाही, जेव्हा नाग स्वतःला सुरक्षित समजत नाही अश्या वेळेस नाग आपला फणा उभारुन आक्रमक होतो. नाग हा जगातला सर्वात भित्रा प्राणी आहे म्हणूनच नाग किंवा इतर कुठला ही साप कधीच बळजबरीने जवळ येऊन चावत नाही, जेव्हा माणूस किंवा इतर जनावर सापाच्या खुप जवळ जातो तेव्हा सापाला भीती वाटते आणि तो आक्रमण होवून चावा घेतो. जेव्हा सापाच्या आपण खूप जवळ जातो, जेव्हा आपण सापाची छेड काढतो, जेव्हा सापाला आपण पकडन्याचा प्रयत्न करतो, जेव्हा सापाच्या अंगावरती आपला हात किंवा पाय पडतो फक्त अशाच वेळेस साप आक्रमक होऊन चावतो, अशी माहिती गांवकर्यांना सर्पमित्र आकाश जाधव यांनी दिली.
साप हा निसर्ग चक्रतील एक घटक आहे याला मरु नये आपल्या घरात, घराजवळ, शेत तळ्यात, किंवा विहिरीमधे साप आढळल्यास सर्पमित्र आकाश जाधव यांना 8888582222 या मोबाइलव रसंपर्क करा असे आवाहन सर्पमित्र आकाश जाधव यांनी केले.
गांवकर्यांनी सर्पमित्र आकाश जाधव यांचे कौतुक आणि धन्यवाद केले.
COMMENTS