अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या आ...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनास सैनिक समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शहरातील तारकपूर बस स्थानक येथे सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनात सैनिक समाज पार्टीचे राज्य कार्यकारणी अध्यक्ष अॅड.शिवाजी डमाळे, दिपक वर्मा, अरुण खिची, भाऊसाहेब अंधळे, सिताराम गायकवाड, राजेंद्र शिंदे, स्वाती गायकवाड आदी सहभागी झाले होते.
यावेळी अॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, सरकारमधील नेत्यांच्या खाजगी मालकीच्या शिवशाही बसेसमुळे एस.टी. महामंडळ तोट्यात आले. संपुर्ण एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा डाव सरकारचा आहे. लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर झाल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सत्ताधार्यांना वेळ नाही. एस.टी. कर्मचार्यांमधून आमदार, खासदार निवडून आल्यास त्यांचे प्रश्न सुटू शकणार आहे. मतदारांच्या गरिबीचा फायदा घेऊन मतखरेदी करुन चुकीचे व्यक्ती निवडून येत आहे. एस.टी. कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी दादागिरी करुन सरकार त्यांचे आंदोलन दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी एस.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला.
एस.टी. कर्मचारी आंदोलक अशोक टकले, दिलावर शेख, सुरेश कासार, पोपट सुरसे यांनी सैनिक समाज पार्टीच्या पाठिंब्याचे पत्र स्विकारले. यावेळी सैनिक समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आंदोलक एस.टी. कर्मचार्यांनी जोरदार निदर्शने केली.