नगर – जिल्हा न्यायालया मधील सेंट्रल बार ही वरिष्ठ वकिलांची संघटना आहे. न्यायालयीन कामकाजास पूर्ण सहकार्य करण्याचे आमचे कर्त्यव्य आहे. कोणत्...
नगर –
जिल्हा न्यायालया मधील सेंट्रल बार ही वरिष्ठ वकिलांची संघटना आहे. न्यायालयीन कामकाजास पूर्ण सहकार्य करण्याचे आमचे कर्त्यव्य आहे. कोणत्याही पक्षकरावर अन्यय होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. वकिलांचे कायद्यांबाबतचे ज्ञान अपडेट व्हावे यासाठी कायदे तज्ञांचे मार्गदर्शक लेक्चरचा महत्त्वपूर्ण उपक्रम पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे. जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासह तज्ञ न्यायाधीश आपल्याकडे आहेत, त्यांच्या ज्ञानाचा लाभ सर्वांनी घ्यावा. जिल्हा न्यायालयात असलेल्या कडक निर्बंधांमुळे दोन वर्षानंतर सेंट्रल बार कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. नुकत्याच झालेल्या शहर वकील संघटनेच्या निवडणुकीत नूतन पदाधिकाऱ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्यासह नव्याने रुजू झालेले व पदोन्नती झालेले न्यायिक अधिकारींचा सत्कार करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन सेंट्रल बार संघटनेचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे यांनी केले.
जिल्हा न्यायालयात सेंट्रल बार संघटनेच्या वतीने नव्याने रुजू झालेले न्यायिक अधिकारी व पदोन्नती झालेले न्यायाधीश व वकील संघटनेचे निवडून आलेल्या पदाधीकारींचा सत्कार करण्यात आला. यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, न्या.बी.एम.पाटील, कौटुंबिक न्यायालयाच्या न्या.नेत्रा कंक, शहर वकील संघटनेचे नूतन अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, उपाध्याक्ष अॅड.संदीप वांढेकर, सचिव स्वाती नगरकर, अॅड.अमित सुरपुरिया, अॅड.ए.के.बंग, माजी अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे आदींसह न्यायाधीशांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील होते. यावेळी बारचे उपाध्यक्ष अॅड.समीर सोनी, खजिनदार अॅड. अभिजित देशपांडे, अॅड. अशोक कोठारी, अॅड.किशोर देशपांडे, अॅड.विश्वासराव आठरे, अॅड.विजय भगत आदींसह वकील वर्ग उपस्थित होते.
प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारक यार्लगड्डा म्हणाले, न्याय व्यवस्थेवर जनतेचा जो विश्वास आहे तो अधिक वाढवायचा आहे. यासाठी प्रत्येक पक्षकारास न्याय मिळावा म्हणून त्यांच्या हिताचे काम सर्वांनी करावे. जिल्हा न्यायालया मधील दोन्ही वकील संघटनांचे लाख मोलाचे सहकार्य न्यायालयाच्या कामकाजात होत आहे. करोनाच्या संकटा नंतर सेंट्रल बारच्या वतीने झालेला सत्कार समारंभ आनंद देणारा आहे.
यावेळी न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, सरकारी वकील सतीश पाटील, अॅड. अनिल सरोदे आदींचे शुभेच्छापर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला उपाध्यक्षा अॅड.सुजाता गुंदेचा व अॅड.रेणू कोठारी यांनी केले. अॅड.योगेश काळे यांनी आभार मानले. यावेळी अॅड.विजया काकडे, अॅड.फारूक शेख, अॅड.बागेश्री जरंडीकर, अॅड.योहान मकासरे, अॅड.उमेश नगरकर, अॅड.अंजली सुद्रिक, अॅड.मंगला कोठारी, अॅड.सतीश बिहाणी, अॅड.साबिक शेख, अॅड.अतुल गुगळे, अॅड.जे.आर.ताकटे, अॅड.अनुपमा भणगे, अॅड.जावेद खान, अॅड.वेद देशपांडे आदींसह सदस्य उपस्थित होते.