वेब टीम : अहमदनगर श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय,श्रीगोंदा या संस्थेस नूतन इमारत बांधकामासाठी रु-५१,०००/ चा धनादेश श्री-बाबा...
वेब टीम : अहमदनगर
श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय,श्रीगोंदा या संस्थेस नूतन इमारत बांधकामासाठी रु-५१,०००/ चा धनादेश श्री-बाबासाहेब गोविंद आनंदकर यांनी आज दिवाळी पाडव्याच्या दिवशी शुक्रवार दिनांक-५ नोव्हेंबर २०२१ रोजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती-वंदना नगरे मॅडम व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य श्री-बाबासाहेब भोस आणि रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर श्री-तुकाराम कन्हेरकर सर यांचे कडे दिला.
श्री-बाबासाहेब गोविंद आनंदकर हे नाशिकचे उपजिल्हाधिकारी श्री-अरुण आनंदकर यांचे वडील आहेत.
आपला उपजिल्हाधिकारी असलेला मुलगा व इतर दोन मुले आणि एक मुलगी यांचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालय,श्रीगोंदा या संस्थेत झाल्यामुळे याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा श्री-बाबासाहेब गोविंद आनंदकर यांचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
COMMENTS