पाडळी रांजणगावात भूमिपुत्र शेतकरी संघटनेची स्थापना सरकारकडुन पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक अतिवृष्टी, पिक विम्याचा फायदा न मिळाल्या...
पाडळी रांजणगावात भूमिपुत्र शेतकरी संघटनेची स्थापना
सरकारकडुन पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक
अतिवृष्टी, पिक विम्याचा फायदा न मिळाल्याने पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी कडू
पारनेर प्रतिनिधी :
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची पाडळी रांजणगाव या ठीकाणी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर व सामाजिक क्षेत्रात काम काम करणाऱ्या असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करून शाखा स्थापन करण्यात आली. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेली पिके उधवस्त झाली. पारनेर तालुका यातुन वगळण्यात आला साधे पंचनामे सुध्दा करण्यात आले नाही. २०१८ पासुन आजतागायत पिकविम्याचे पैसे शेतकर्यांना मिळाले नाही. या शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींच ही दुर्लक्ष होत असल्याची खंत सर्वच वक्त्यांनी केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे अध्यक्षीय भाषणात बोलताना पाण्याच्या प्रश्नावर पुणे जिल्हा आपले पाणी पळवत आहे. यावर न्यायालयीन लढाई पुर्ण ताकतीने सरू केली असल्याचे सविस्तर सांगितले. नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विशाल करंजुले यांनी बोलताना आगामी काळात भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातुन शेतकर्यांच्या पोरांना संघटीत करून पारनेर तालुका कसा वेगळ्या विचारांचा आहे याचा आदर्श पुर्ण राज्याला दाखऊन देणार आहे. येणारा काळ हा शेतकर्यांनसाठी फार कठीण असनार आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पोरांना संघटीत होण्याच अवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संघटनेचे प्रदेश सचिव किरण वाबळे, उपाध्यक्ष असिफ शेख, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष राम वाडेकर, जिल्हा सचिव संतोष कोरडे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम देठे, सामाजिक कार्यकर्ते वसंत साठे, बहुजन क्रांतीचे राजेंद्र करंदिकर, छत्रपती क्रांतीसेनेचे अविनाश देशमुख, युवक तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे, बैलगाडा संघटनेचे बाळशिरामशेठ पायमोडे, तालुका कार्याध्यक्ष नंदु साळवे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, युवक कार्याध्यक्ष संजय भोर, संदिप जाधव, सुनिल गागरे, देसवडे सोसायटीचे चेअरमन संजय भोर, नंदन भोर, राळेगण थेरपाळचे उपसरपंच अकाश मोरे, म्हसणे शाखा उपाध्यक्ष गाेरख बागल, विलास गुंड, संजय बालवे, वसीम शेख, सागर शिरसाठ, पाडळी शाखाध्यक्ष ताराचंद करंजुले, युवक शाखाध्यक्ष तुषार ऊबाळे, उपाध्यक्ष योगेश करंजुले, सचिव रोहीदास ऊघडे, उसरपंच यांच्यासह मोठ्या संख्खेने शेतकरी ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ करंजुले मेजर यांनी केले.
COMMENTS