शहरात ७४ वर्षीय वृद्धेवर अत्याचार! तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत अहमदनगर : तारकपूर परिसरात एका वृद्धेला मारहाण करुन तिच्यावर अत्...
शहरात ७४ वर्षीय वृद्धेवर अत्याचार!
तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
अहमदनगर :
तारकपूर परिसरात एका वृद्धेला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना शुक्रवारी पहाटे समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसांनी पीडित वृद्धेच्या जबाबावरुन गुन्हा दाखल केला आहे.
राजू साहेबराव काते (रा. लालटाकी, अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली. पीडित वृद्ध महिला भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करते. आरोपी हा नेहमी दारु पिवून वृध्देच्या घरी जात होता. ११ नोव्हेंबर रोजी रात्री वृद्ध महिला झोपलेली असताना आरोपीने तिच्या घरात घुसून तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर पीडित महिला रात्रभर तशीच पडून राहिली. दिवस उजाडल्यावर इतरांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले. पोलिसांनी कलम ३७६, ४५२, ३२३, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS