युवक काँग्रेसच्या माध्यमातून विकासात्मक काम करणार : योगेश शिंदे टाकळी ढोकेश्वर गटात काँग्रेस पक्ष बळकट करणार वासुंदे येथे एलईडी सौरदिवे देण्...
युवक काँग्रेसच्या माध्यमातून विकासात्मक काम करणार : योगेश शिंदे
टाकळी ढोकेश्वर गटात काँग्रेस पक्ष बळकट करणार
वासुंदे येथे एलईडी सौरदिवे देण्याचे आश्वासन
वासुंदे येथील युवकांची सदिच्छा भेट
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे हे सध्या तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी संघटनात्मक पातळीवर काम करत असून काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पारनेर तालुका काँग्रेस युवक अध्यक्ष योगेश शिंदे हे पारनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी व कॉंग्रेसला संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी आता कंबर कसली आहे. टाकळी ढोकेश्वर गटातील अनेक युवकांच्या ते सध्या भेटीगाठी घेत असून युवकांचे व विद्यार्थ्यांचे असलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
टाकळी ढोकेश्वर गटातील युवक जेष्ठ व ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेल असे पत्रकारांशी बोलताना योगेश शिंदे यांनी सांगितले. वासुंदे येथे दिनांक 17 रोजी पारनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे व उपाध्यक्ष गणेश गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी वासुंदे येथील युवकांन सोबत त्यांनी विविध विकासात्मक व धोरणात्मक प्रश्नांवरती व समस्यांवर चर्चा केली. यावेळी युवक काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र काम करावे व काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करावेत असे योगेश शिंदे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
दरम्यान जिल्ह्यात व तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच बाजार समिती व इतर सोसायटी व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत व काँग्रेसला निश्चितच टाकळी ढोकेश्वर गट व पारनेर तालुक्यात नवसंजीवनी देणार आहोत. पारनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे यांनी वासुंदे येथे भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष गणेश गायकवाड अँटी करप्शनचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोजभैय्या झावरे पाटील, गाडी लोहार संघटनेचे अध्यक्ष निलेश उर्फ दादा भालके, निलेश गायखे, अनिल हिंगडे, पैलवान शरद हिंगडे, शुभम गायखे, सागर साळुंके, गणेश दाते, प्रफुल्ल झावरे, बंटी बर्वे, विनायक झावरे, आदी वासुंदे येथील युवक उपस्थित होते.
योगेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांनी नेहमीच युवकांचे व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच समाजातील आदिवासी दलित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. कृषी क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेले काम हे आजच्या युवावर्गाला निश्चितच प्रेरणा देणारे आहे योगेश दादा शिंदे हे एक उत्तम उद्योजक असून त्यांच्या व्यवसायिक विचारांचाही निश्चितच युवा वर्गाला फायदा होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते सध्या उत्तम असे कार्य समाजामध्ये करत आहेत.
मनोजभैय्या झावरे पाटील
(अध्यक्ष : अँटिकरप्शन, पारनेर)
COMMENTS