रांधे येथील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणार : प्रवीण साबळे पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील ...
रांधे येथील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देणार : प्रवीण साबळे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील रांधे येथील ग्रामस्थ व युवक यांच्यावतीने आयोजित केलेल्या भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील मंगरुळ येथील क्रिकेट संघाला प्रथम बक्षीस ११ हजार व चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शेतकरी ब्रँड रांधे या संघास देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस अळकुटी संघाला मिळाले. चतुर्थ बक्षीस व्हिआयपी रांधे संघास मिळाले आहे.
मॅन ऑफ रवि फापाळे, मॅन ऑफ दी सिरीज रोहन साबळे, उत्कृष्ट गोलंदाज कुणाल बोरुडे, उत्कृष्ट फलंदाज ऋतीक फापाळे यांना ही बक्षीसे देण्यात आली. लंके प्रतिष्ठानचे मुंबई विभागाचे प्रमुख पदाधिकारी प्रविण साबळे, सरपंच अरुण आवारी, उपसरपंच संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थ यांच्या संयोजनाखाली या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली.
शिरुर, जुन्नर, पारनेर तालुक्यातील क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. क्रिडाप्रेमी व ग्रामस्थांनी उपस्थीत राहुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. माजी सरपंच सोन्याबापू आवारी, हौशाभाउ आवारी, अमित बढे, मंगेश श्रीसागर, मंगेश रोकडे, अंकुश साबळे, अनिल लक्ष्मण आवारी, महेश आवारी, संजय सोनवणे, रोहन आवारी, ज्ञानदेव थोरात, शरद आवारी, गणेश शेलार सचिन आवारी, विशाल आवारी, वैभव साबळे, अरुण शिंदे, विशाल झिंजाड, किरण आवारी,
नवनाथ भोसले, शेखर गहाणडुले, दस्तगीर तांबोळी, राजेंद्र आहेर, किरण शेटे, संतोष शिंदे, घनश्याम आवारी, सचिन म्हसकुले, रामदास भोसले, विनायक गहाणडुले, लहु साबळे, गणेश आवारी, भगवान पावडे, अक्षय साबळे, गणेश आवारी, ऋतीक फापाळे, रोहन साबळे, शाहिद शेख, याकुब शेख, ऋषी फापाळे आदी तसेच ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले.
COMMENTS