आ.निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा विजेचा प्रश्न लवकरच सुटणार...! ---- आ.निलेश लंकेंच्या कार्यतत्परतेवर शेतकरी समाधानी. .. पा...
आ.निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचा विजेचा प्रश्न लवकरच सुटणार...!
----
आ.निलेश लंकेंच्या कार्यतत्परतेवर शेतकरी समाधानी...
पारनेर / प्रतिनिधी :
तालुक्यातील कान्हुर पठार विद्युत उपकेंद्रातील किन्ही , बहिरोबावाडी व तिखोल या गावांसह विविध भागात कृषीपंपांना सुरळीत व उच्च दाबाने विजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने सोमवारी आमदार निलेशजी लंके यांनी तातडीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची पारनेर येथे संपर्क कार्यालयात बैठक घेत कमी दाबाने होणा-या विजपुरवठ्याबद्दलची कारणे जाणून घेतली.या दरम्यान महावितरण कंपनीचे पारनेर उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी सांगितले की , नगरवरून आलेल्या १३२ kv उच्चदाबाच्या लाईनचे काम चास या ठिकाणी काहि दिवसांपासून बंद असल्याने सध्या आपल्याला पुणे जिल्ह्याकडुन विजपुरवठा होत आहे.
परंतु आपल्या मागणीप्रमाणे विजपुरवठा होत नसल्याने वारंवार विजपुरवठा खंडित होत आहे तरी चास येथील काम पूर्ण झाल्यास आपल्याला पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होईल.यावर आ.निलेश लंके यांनी तात्काळ महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी , जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करत सदर रखडलेले काम चार - पाच दिवसात पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या , तद्नंतर महावितरणची यंञणा कार्यान्वीत झाली असून सदरील अपुर्ण काम काही दिवसांत पूर्ण होऊन पारनेर तालुक्यातील विजेचा प्रश्र्न लवकरच सुटणार आहे. या बैठकीला शेतकरी नेते अनिल देठे पाटील , विद्युत सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रभान ठुबे , उद्योजक सुरेशशेठ धुरपते , शिक्षक नेते बाळासाहेब खिलारी , युवा नेते संदिप ठाणगे ,
म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे , तिखोलचे सरपंच अनिल तांबडे , किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे , संदिप चौधरी , अनिल गंधाक्ते , राजाराम देठे सर , इंजि.रविंद्र देठे , बापु व्यवहारे , पांडुरंग व्यवहारे , शरद व्यवहारे , मारूती सावंत , गंगाधर देठे , शिवाजी खोडदे , बबन देठे , बाळासाहेब शिंदे , भिकाजी व्यवहारे , साहेबराव व्यवहारे , संपत खोडदे , किरण खोडदे , अक्षय खोडदे , कनिष्ठ अभियंता श्री चरडे , श्री भुजबळ , संदिप पवार आदि उपस्थित होते.
शेतकरी , कष्टकरी व पिडीत वर्गाचे प्रश्र्न प्राधान्याने सोडवणारे कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आमदार निलेशजी लंकेंच्या रूपाने पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघाला लाभले आहे.सध्यस्थितीत शेतीच्या रब्बी हंगामास सुरूवात झालेली असल्याने पिकांच्या उभारणीच्या कामाला वेग आलेला आहे.आणि परिस्थितीतच विजेच्या लपंडावामुळे शेतकरी ञस्त झालेला होता माञ आमदार लंकें यांनी तातडीने विजेच्या प्रश्नात लक्ष घालुन तो सोडविण्यासाठी महावितरण कंपनीची यंञणा कार्यान्वीत केली त्याबद्दल त्यांचे आभार !
-- अनिल देठे पाटील
( शेतकरी नेते )
तिखोल येथिल सिंगल फेज चे रखडलेले काम तसेच तिखोलसाठी स्वतंञ गोरेगाव येथे पॉवर ट्रान्सफार्मर मंजुर करणे या कामांना हि आमदार निलेशजी लंके साहेबांमुळे गती मिळाली असुन , लवकर तिखोलचा विजेचा प्रश्र्न सुटण्यास मदत होईल.
-- संदिप ठाणगे
( युवा नेते तिखोल )