कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा विजय भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल उगले यांची प्रतिक्रिया पारनेर प्रतिनिधी : केंद्र सरका...
कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा विजय
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल उगले यांची प्रतिक्रिया
पारनेर प्रतिनिधी :
केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषि विषयक कायदे माघारी घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली आहे. त्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर हा तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमोल उगले यांनी यांनी म्हटले आहे. हे तिन काळे कायदे रद्द व्हावे यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अमोल उगले यांनी ही आंदोलनात सहभाग घेतला होता शेतकऱ्यांच्या या मागणीला आता यश आल्याने हा खऱ्या अर्थाने सर्व आंदोलन करणार्या शेतकऱ्यांचा विजय असल्याचे शेतकरी पुत्र अमोल उगले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.